Marathi

पं. उपेंद्र भट यांना ‘कंठ संगीत’ पुरस्कार जाहीर

Prev1 of 3
Use your ← → (arrow) keys to browse

पं. उपेंद्र भट यांना ‘कंठ संगीत’ पुरस्कार जाहीर

 

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार, २०१६ ची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. यातील ‘कंठ संगीत’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट यांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हे पुरस्कार नाट्य, तमाशा, नृत्य, कंठ संगीत, किर्तन, कलादान, वाद्यसंगीत, शाहिरी, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट, लोककला व आदिवासी गिरीजन कला या १२ क्षेत्रांसाठी प्रदान करण्यात येतात.

 

शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट हे पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पट्टशिष्य असून पंडितजींकडून त्यांना तालीम मिळाली असून, त्यांची कारकीर्द जवळून पाहाण्याची संधीही त्यांना मिळाली आहे. आपल्या गुरूप्रमाणे पं. उपेंद्र भट यांचे संगीतक्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, राग निर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वंगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गाण्याला आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील ‘कंठ संगीत’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पं. उपेंद्र भट यांनी आनंद व्यक्त करीत, ‘हा पुरस्कार माझ्या ‘भीमसेनी’ गायकीला मिळालेला पुरस्कार आहे असे मी मानतो आणि विनम्रतेने स्विकारतो’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. रु. १,००,०००/- रोख, शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

Prev1 of 3
Use your ← → (arrow) keys to browse

Click to comment

Trending

Copyright © 2019 Oye Filmy!